Brinda Karat : केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ या प्रमाणे ‘हर घर संविधान’ हा उप्रकमही राबवावा – कॉ. वृंदा करात

The Central Government should also implement the initiative of 'Har Ghar Constitution' like 'Har Ghar Tricolor' - Com. Brinda does

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आता त्याचप्रमाणे मोदी सरकारने ‘हर घर संविधान’ असा उप्रकमही राबवावा, असे मत कम्युनिस्ट नेत्या माजी राज्यसभा सदस्या कॉ. वृंदा करात (Brinda Karat) यांनी व्यक्त केले आहे. कॉ. करात यांना विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी त्यांनी कार्यक्रमापूर्वी माध्मयमांशी सवांद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या, “भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तिरंग्याचे तीन रंग मान्य नाहीत. त्यांना फक्त भगवा रंगच आपला वाटत आला आहे. तरीही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ या प्रमाणे ‘हर घर संविधान’ हा उपक्रमही भाजपने राबवावा असे आवाहन देखील त्यांनी केले.

पुढे त्या म्हणाल्या, ईडी, सीबीआय, आयटी या संस्था आता अन्य पक्षातील लोकांना भाजपमध्ये आणण्यासाठी अस्त्रासारख्या योजना भाजपकडून वापरल्या जात आहेत. केंद्रीय संस्थांचा वापर पक्ष वाढविण्यासाठी सुरू केला जात आहे. देशात ३ हजार ७०० जणांवर ईडीने कारवाई केली, पण, यापैकी फक्त २३ दोषी आढळले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *