Site icon e लोकहित | Marathi News

Electric Tractor । सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तास काम करणार

The cheapest electric tractor! It will work for 8 hours after charging for 2 hours

Electric Tractor । सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आर्थिक ताण येत आहे, त्याचा फटका कृषी क्षेत्रावरही झाला आहे. अलीकडच्या काळात ट्रॅक्टरच्या (Tractor) मदतीने जमिनीची पूर्व मशागती पासून ते पिकांची काढणी केली जाते. परंतु महाग इंधनामुळे (Expensive fuel) शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. (Latest Marathi News)

Chandrayaan 3 । “तुमच्या कार्याला आणि धैर्याला सलाम”; नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा

परंतु, बाजारात सध्या वेगवेगळ्या कंपन्या आपले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच (Electric Tractor Launch) करू लागल्या आहेत. यामध्ये केवळ शानदार फीचर्स नाहीतर जबरदस्त मायलेजही मिळत आहे. ज्यामुळे इंधनाचा खर्च वाचेल आणि कमी वेळेत शेतीचे काम होईल. बाजारात असे 3 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहेत, जे फक्त 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तास चालतात. जाणून घेऊयात त्यांचे फीचर्स आणि किंमत. (Electric Tractor Price)

Havaman Andaj । मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस, हवामान खात्याने कुठे दिला अलर्ट? जाणून घ्या एका क्लिकवर

सोनालीका टायगर 11HP

हा ट्रॅक्टर तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुम्हाला फळबागातील महत्त्वाची कामे करता येतील. 25.5 किलोवॅटची नॅचरल कूलिंग बॅटरी दिली असून तो फास्ट चार्जिंग पर्यायामुळे चार तासात पूर्ण चार्ज होतो. त्यांनंतर तो ८ तास चालतो. याची किंमत सहा लाख 40 हजार ते सहा लाख 72 हजार रुपये इतकी आहे. (Sonalika Tiger 11HP)

Sharad Pawar । कृषीमंत्री असताना तुम्ही किती मदत केली हे सांगा; ‘या’ बड्या नेत्याचा शरद पवारांना सवाल

एचएव्ही हायब्रीड ट्रॅक्टर

हा देशातील पहिला हायब्रीड ट्रॅक्टर आहे. तो विजेवर आणि डिझेल किंवा सीएनजीवर चालतो. या सीरिजचे दोन प्रकारचे मॉडेल असून यातील 50 एस 1 हे मॉडेल डिझेल हायब्रीड आहे. तर 50 एस 2 हा सीएनजी ट्रॅक्टर आहे. तो डिझेल आणि सीएनजीवर चालतो. किमतीचा विचार केला तर या ट्रॅक्टरची किंमत आठ लाख 50 हजार रुपयांपासून पुढे आहे. (HAV Hybrid Tractor)

Political News । प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

X45H2 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

अलीकडेच आऊटोनेक्स्ट ऑटोमेशन या कंपनीने आपला X45H2 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. फास्ट चार्जिंग पर्यायामुळे केवळ दोन तासांत हा ट्रॅक्टर पूर्णपणे चार्ज होतो. त्यानंतर तो तब्बल 8 तास चालतो. त्यामुळे जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Neeraj Chopra । नीरज चोप्राने मिळवला वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप अंतिम फेरीत प्रवेश, पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीटही झालं कन्फर्म

Spread the love
Exit mobile version