Site icon e लोकहित | Marathi News

Ashadhi Wari 2023 । आषाढी वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

The Chief Minister has taken a bold decision for Asadhi workers!

आषाढी वारी सुरु आहे. (Ashadhi Wari 2023) सगळे भाविक भक्त वारीमध्ये रवाना झाले आहेत. यावर्षी बऱ्याच पायदिंड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान, वारकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. (Latest Marathi News)

ब्रेकिंग! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी योजनेची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याची घोषणा सरकारने केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल.

शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पशुखाद्यही महागले

‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजनेत ‘या’ बाबींचा समावेश

१) एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
२) दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील.
३) अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये देण्यात येतील
४) वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार.

दिल्लीत मेट्रोमध्ये पुन्हा एकदा जोडप्याचा किसींग सीन व्हायरल; व्हिडीओ व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ उत्तर

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे.

भाजपकडून बारामतीत पवारांना मोठा धक्का? राजकीय वातावरण तापले

Spread the love
Exit mobile version