सर्व व्यसनांमध्ये दारूचे (Alcohol) व्यसन खूप घातक आहे. दारूमुळे त्या व्यक्तीच्या शरीरावर तर परिणाम होतोच परंतु, त्याच्या संपूर्ण कुटुंबावरही खूप मोठा परिणाम होतो. अनेकजण दारूच्या नशेत गाडी चालवतात त्यामुळे अपघात घडत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दारूचे सर्व वाईट परिणाम (Bad effects of alcohol) माहिती असूनही अनेकजण दारू पिणे सोडत नाही. याच दारूमुळे अनेक वाद होतात. (Latest Marathi News)
अनेकवेळा हे वाद खूप टोकाला जातात आणि संपूर्ण कुटुंब उद्धवस्त होते. सध्या असेच एक प्रकरण बिहारमधील कटिहार येथून समोर आले आहे. धर्मेली गावात राहत असणाऱ्या धर्मेंद्र कुमारला दारूचे खूप व्यसन होते. दारूमुळे तो सतत त्याच्या पत्नीसोबत भांडण करत असायचा. त्या दोघांना दोन मुले आहेत. घटनेच्या दिवशीही त्याचा आणि त्याच्या पत्नीचा वाद झाला, परंतु हा वाद एकटा विकोपाला गेला की त्याने रागाच्या भरात पत्नीची हत्या केली. (Crime News)
Vidharbha Rain Update । मुसळधार पावसाने विदर्भात 48 तासात घेतला 8 जणांचा बळी, तर 30 नागरिक जखमी
त्यानंतर त्याने तेथून पळून जाऊन स्वत:चे जीवन संपवले. दोन्ही मुले शाळेत गेल्याने वाचली आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
Bike Loan | खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आता सोप्या पद्धतीने मिळणार दुचाकीसाठी कर्ज