Site icon e लोकहित | Marathi News

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय! २८ आठवड्यांच्या गर्भपातास दिली परवानगी

The comforting decision of the Supreme Court! Abortion at 28 weeks allowed

Supreme Court | सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) बलात्कारानंतर गर्भपात करण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देण्यापूर्वी न्यायालयाकडून वैद्यकीय विभागाकडून (Medical Department) अहवाल मागवण्यात आला होता. या अहवालावर अभ्यास करून न्यायालयाने याप्रकरणी २८ आठवड्यांची गर्भवती असणाऱ्या महिलेला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. (Latest Marathi News)

Karan Johar । करणने सांगितले बॉक्स ऑफिस कमाईमागचं सत्य,म्हणाला; “आम्ही सगळे खोटारडे..”

निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की लग्न झाले असते त्यावेळी गर्भधारणा ही त्या महिलेसाठी, त्या जोडप्यासाठी आणि त्या परिवारासाठी आनंदाची गोष्ट असते. परंतु, विवाहाशिवाय गर्भधारणा त्या महिलेसाठी मानसिकरित्या आणि शारीरिक आरोग्यसाठी खूप त्रासदायक असते. संबंधित महिलेचे गर्भधारणेमुळे मानसिक आरोग्य बिघडून त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.

Kisan Drone Subsidy । ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून मिळतेय 5 लाखांची मदत, असा करा अर्ज

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेडिकल बोर्डाकडून किमान २४ आठवड्याच्या गर्भपाताला मान्यता मिळते. हा देशातील वेगळा निर्णय आहे. देशात कलम १९७१ नुसार विवाहित महिला गर्भपात करू शकते. गर्भाचा कालावधी किमान २० आठवडे असू शकतो. यात देखील काही महत्त्वाच्या अटी आहेत.

Dhanajay Munde । कांदा प्रश्नावरून तोडगा निघणार? धनंजय मुंडे घेणार पियुष गोयल यांची भेट

Spread the love
Exit mobile version