दिल्ली : गुगल कंपनी काही कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याची बातमी समोर येत आहे. गुगलमधील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलेले आहे की, पुढच्या येणाऱ्या काळामध्ये चांगले काम करुन दाखवा, नाहीतर कंपनी घेईल त्या निर्णयाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कर्मचाऱ्यांची देखील संख्या कमी करावी लागेल, अशी धमकी गुगल (Google company)या नामांकित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली आहे.
गुगुल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतेच एक विधान केले आहे. ते म्हणाले कंपनीकडे खूप जास्त प्रमाणात कर्मचारी आहेत. पण त्या तुलनेमध्ये काम काहीच होत नाही. त्यांनी कर्मचाऱ्यांना काम चांगले करण्याचा सल्ला दिला होता. गुगल कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण विक्रीची उत्पादकता आणि कर्मचाऱ्यांची (employee cut) उत्पादकता पाहून नोकरीवर ठेवायचे का नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
पुढच्या तीन महिन्यामध्ये कंपनीला किती नफा होणार यावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार का नाही ते ठरवले जाणार असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनीतील कर्मचाऱ्यांची प्रोडक्टिविटी अपेक्षित नसल्याची चिंता पिचाई यांनी व्यक्त केली आहे. जुलैमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी, दोन आठवड्यांसाठी हायरिंग रोखण्यात आले आहे.