यंदाच्या वर्षी मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सध्या अनेक भागांत खरीप पिकांची काढणी सुरु आहे. परंतु आता पुन्हा परतीचा मुसळधार पाऊस (haivy rain) सुरु झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आता राज्यातील कापूस (Cotton) उत्पादनात रोग आणि पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धक्कादायक! नवरात्रीनिमित्त घातलेल्या मंडपाला आग लागून दोन जणांचा मृत्यू तर, ६४ जण होरपळले
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी झाली आहे. परंतु यावेळी कापसावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात जळगाव, धुळे, खानदेश, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये कापसाची सर्वाधिक लागवड होते. तसेच नंदुरबार जिल्ह्यातही कापसाची लागवड (Cotton cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० ऑक्टोबरपर्यंत मिळणार ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान, वाचा सविस्तर
यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एक लाख २५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात कापसावर तुषार व गुलाबी अळीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच या कीटक आणि रोगांमुळे पाने पिवळी आणि लाल होतात. दरम्यान एकंदरीतच यंदा वेळेवर झालेला पाऊस आणि सुपीक वातावरणामुळे कापसाचे चांगले उत्पादन होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे.
Eknath Shinde: जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…