कानपूर ( Kanpur) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या पत्नीला तिच्या मित्रासोबत चुकीच्या अवस्थेत पाहून पोलीस हवालदाराच्या पायाखालची जमीम सरकली. विशेष बाब म्हणजे त्याची पत्नी सुद्धा महिला कॉन्स्टेबल ( Lady Police Constable) आहे. कानपूरच्या पोलीस लाईनमध्ये हे पोलीस जोडपे राहत होते. आपला नवरा कामावर गेल्यानंतर या महिलेने आपल्या वकील मित्राला कॉल करून बोलावून घेतले. याबाबतची माहिती मिळताच महिलेचा पती ११२ नंबर डायल करून पोलिसांना घेऊन अचानक घरी आला.
धक्कादायक! नवविवाहित जोडपे रात्री झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेले; मात्र त्यांनतर असं घडलं की दोघेही…
अन् त्याने आपल्या पत्नीला व तिच्या मित्राला आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. यावेळी रागात असलेल्या पतीने आपल्या पत्नीचा व तिच्या मित्राचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. दरम्यान या गोष्टीला पत्नीने विरोध करताच पती भडकून म्हणाला की, लाज कशाची वाटते ? मी तर तुझा नवराच आहे. यानंतर पोलिसांनी त्या महिलेला व तिच्या वकील मित्राला शहर पोलीस ठाण्यात नेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांपूर्वी या महिला कॉन्स्टेबलचा आपल्या पतीसोबत विवाह झाला होता. मात्र वाद झाल्यानंतर हे दोघेही वेगळे राहत होते. या महिला कॉन्स्टेबलने आपल्या पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा कोर्टात प्रलंबित आहे. या दोघांच्या वादाचे कारण महिला कॉन्स्टेबलचे चारित्र्यहीन वागणे आहे. अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे.