मुंबई : ऋषभ आणि उर्वशी २०१८ मध्ये एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. दोघांनी कधीही आपल्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या नात जेव्हापासून सुरू होत तेव्हापासून ते दोघं चर्चेत आहेत. पण मागील काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये वाद सुरू असल्याचं स्पष्ट दिसून येतय.
Twin Tower: जमीनदोस्त झालं नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स, लगतच्या परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण
या दोघांनी एकमेकांची नावं न घेता अनेक पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केल्या. पण या पोस्ट वरून सरळ सरळ समजत होत की या दोघांमध्ये काही तरी बिनसल आहे. २०१८ मध्ये ऋषभ आणि उर्वशी (Urvashi) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या.
दोघांनी कधीही आपल्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. उर्वशी-ऋषभ यांच्यामधील वादाला कारण ठरल उर्वशीची पोस्ट.उर्वशीने पोस्टमध्ये ‘आरपी’ नावाचा क्रिकेटपटू मला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये तासनतास थांबायचा, असा दावा उर्वशीने केला. हेच कारण ठरल उर्वशी-ऋषभ यांच्यामधील वादाला.
Nitin Gadkari: “मी विहिरीत उडी मारुन मरुन जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही” – नितीन गडकरी
उर्वशीची नवीन पोस्ट
उर्वशीने स्वतःचा बोल्ड लूकमधील व्हिडीओ शेअर करत म्हणाली की, “मी माझी बाजू न मांडता तुझी प्रतिष्ठा वाचवली आहे.” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.उर्वशीच्या या कॅप्शनमुळे ऋषभला पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे उर्वशीने सुनावलं असल्याची चर्चा आहे.
Sanjay Rathod: मोठी बातमी! संजय राठोडांना कोरोनाची लागण, घरातच औषधोपचार सुरू
देव त्यांना सद्दबुद्धी देवो – ऋषभ पंत
काही दिवसांपूर्वी ऋषभने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली होती. “प्रसिद्धीसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी लोक मुलाखतींमध्ये किती खोटं बोलतात. देव त्यांना सद्दबुद्धी देवो.” असं ऋषभने म्हटलं होतं.दरम्यान आता उर्वशीच्या या नव्या पोस्टमुळे या दोघांच्या वादाला सुरुवात होणार का? आणि ऋषभ उत्तर देणार का याची चर्चा सुरू झाली.