मागच्या आठवड्यात माळशिरस तालुक्यातील अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाने लग्न केले होते. नंतर लग्न केल्याच्या प्रकरणाची दखल थेट राज्य महिला आयोगाने घेऊन. त्या तरुणाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. दोन मुलीशी लग्न केलेल्या तरुणाचे नाव अतुल अवताडे असे आहे.
पंढरपुरातील मंदिरे पाडण्याच्या निर्णयामुळे, भाजपच्याच जेष्ठ नेत्याने केले नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप
या लग्नानंतर एक महत्वाची माहिती समोर आली. या लग्नानंतर अतुलविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. जुळ्या बहिणींचा विवाह झाल्याने वराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतुलविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४९४ अन्वये पोलीस ठाण्यात एनसीआरची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनीही गुन्हा दाखल करत हे प्रकरण कोर्टात नेले होते. पण आता सोलापूर न्यायालयाने अतुलला मोठा दिलासा दिलाय.
Sai Pallavi: ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून साई पल्लवी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
अतुलची चौकशी करण्याची परवानगी पोलिसांनी मागितली होती. पण न्यायालयाने ती परवानगी नाकारली असून त्यामुळे या प्रकऱणात अतुलवर कुठलीही कारवाई होणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
ब्रेकिंग! पोलीस बंदोबस्त असून चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याने ११ पोलीस कर्मचारी निलंबित