
Curative Petition । नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचा(Maratha Reservation) वाद खूप टोकाला पोहोचला आहे. मराठा समाज हा आरक्षणासाठी खूप आक्रमक झाला आहे. याच मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. (Latest marathi news)
क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्वीकारले आहे. याच मुद्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या खंडपीठासमोर इन-चेंबर सुनावणी पार पडली होती. यावेळी राज्य सरकारकडून आपली भूमिका मांडली होती. या प्रकरणी लवकरच न्यायालय निकाल देईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आज या प्रकरणी सुनावणी पार पडली. त्यामुळे राज्य सरकारला (State Govt) काहीसा दिलासा मिळाला आहे.
Accident News । दुर्दैवी! एकाच दिवशी चार भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
मराठा आरक्षणाबद्दलची क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारला शेवटची संधी. सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या 24 जानेवारीला पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या या सरकारला तात्पुरता दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. पुढील सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचे असेल.