Sharad Pawar | गुजरातमधील एका स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नाव दोन वर्षांपूर्वी देण्यात आले होते. आता पुण्यातील (Pune) गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला (Cricket Stadium) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना पत्र दिले आहे.
शाईफेकनंतर अयोध्या पोळ यांनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या, “ठाकरे गटाच्या बाजूने पोस्ट…”
या पत्रात असे म्हटले आहे की, “मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय त्याचबरोबर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांचे क्रीडा विश्वात आणि विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या निवृत्त क्रिकेटर्सला पेन्शन सुरू करणे यासारखे मोठे निर्णय पवार साहेबांच्या कारकिर्दीत होऊ शकले”.
कोंबडी अगोदर की अंड? शेवटी सापडलं उत्तर! शास्त्रज्ञांनी केला खुलासा
गुजरात येथील मोटेरा स्टेडियमला जसे नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनच्या मालकीच्या पुणे येथील गहुंजे स्टेडियमला खा. शरदचंद्र पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी रोहित पवार यांच्याकडे केली आहे.