Site icon e लोकहित | Marathi News

सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत घेतला भाजप सोबत जाण्याचा निर्णय, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

The decision to go with BJP was taken in the presence of Supriya Sule

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा पक्षात बंड करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे. शिंदे फडणवीस (Shinde – Fadanvis) सरकार सोबत हात मिळवणी करत त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत इतर आठ आमदारांनीही मंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच अजित पवार यांनी पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे.

अजित पवारांकडून जिल्हाध्यक्षांना एकत्र येण्याचे आवाहन, संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ‘नॉट रिचेबल’

“शिंदे फडणीस सरकारसोबत सत्तेत जायचं की नाही, हे शरद पवारांना विचारावे आम्हाला वाटलं नाही. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी अजित पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळेदेखील (Supriya Sule) उपस्थित होत्या. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीतच भाजपमध्ये जाण्याचा ठरलं,” असा खळबळजनक दावा आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ओडिशातील बालासोर अपघातात चूक नेमकी कोणाची? तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड

“अजित पवार यांनी आम्हाला बोलवून भाजपसोबत जाण्याविषयी त्यांनी आमच्याशी चर्चा केली. राज्याच्या विकासासाठी, लोकहिताची कामं करण्यासाठी आपण सत्तेत असणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही सह्या दिल्या”, असं सुनील शेळके यांनी स्पष्ट केले.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! टीना अंबानी यांची ईडीकडून चौकशी सुरु

Spread the love
Exit mobile version