
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगेवेगळ्या क्षेत्रातील लोक शुभेच्छा देत आहेत. यामध्ये कलाकार मंडळी देखील मोदींवर शुभेच्छांचं वर्षाव करत आहे. आता यामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ट्विट द्वारे एक खास व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Cheetah Is Back: तब्बल 70 वर्षांनंतर नामिबियातून भारतात आले आठ विदेशी चित्ते
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणतात की,“मनापासून मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. त्यांना दिर्घायुष्य लाभो तसेच नेहमी निरोगी राहो हिच देवाचरणी प्रार्थना करतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भारतामध्ये एक नवा उत्साह निर्माण केला तसेच भारतीयांचे मनोबल वाढवलं त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.”
My wishes to @narendramodi on his birthday. You have infused a new energy, confidence and hope, specially amongst the underprivileged, women and the youth of Bharat. May God give you long and healthy life to achieve your dharmik goals. pic.twitter.com/zDIGtxqeMF
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) September 17, 2022
त्याचबरोबर विवेक अग्निहोत्री म्हणाले, तुम्ही याच उत्साहाने भारतीयांसाठी तसेच भारतामधील तरुण आणि इतर लोकांसाठी काम करत राहावं. तुम्हाला भारतीयांकडून खूप सारं प्रेम. जगभरात भारत देशाचं नाव अधिक पुढे नेण्यासाठी तुम्हाला ताकद मिळो.” अशा पद्धतीने विवेक अग्निहोत्रींनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विवेक अग्निहोत्रींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. यावर कमेंट करत नेटकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.