राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी शपथ घेतल्याने पुन्हा एकदा भूकंप घडून आला आहे. राज्यात नवीन समीकरणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त अजित पवार नाही तर त्यांच्यासोबत इतर ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटासोबतच भाजपमध्येही (BJP) नाराजीचा सूर दिसून येत आहे. (Latest marathi News)
प्रफुल्ल पटेल यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘शिंदे गुवाहाटीत असताना राष्ट्रवादीच्या 51 आमदारांनी…
हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे मंत्री झाल्याचे समजताच त्याचे कोल्हापुरमध्येही (Kolhapur) तीव्र पडसाद उमठत आहेत. मुश्रीफ यांच्या मंत्रीपदामुळे कागलमध्ये भाजपचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे (Samarjit Ghatge) हे नाराज झाले असून सध्या ते नॉटरिचेबल झाले आहेत. तसेच त्यांच्या समर्थकांकडून पोस्टरबाजी आणि घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांकडून मुश्रीफ यांचा विरोध करण्यात येत आहे. तसेच पुण्यातील (Pune) भाजपमधील नेते देखील अजित पवार यांच्या प्रवेशाने नाराज झाले आहेत.
Eknath Shinde । मंत्रिमंडळ विस्तार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले…
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गेल्या वर्षी शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. या घटनेला एक वर्ष झाले नाही तोपर्यंत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असलेल्या अजित पवार आणि इतर नेत्यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी करत अजित पवार यांना राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनवले. परंतु फडणवीस यांच्या या खेळीने भाजप आणि शिंदे गट नाराज झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.
बिग ब्रेकिंग! राष्ट्रवादीला मोठा धक्का, अमोल कोल्हे देणार शरद पवारांकडे खासदारकीचा राजीनामा
हे ही पहा