
आपण पाहतो की सर्वात जास्त पाणीपुरी (panipuri) खाण्याचा नाद हा मुलींना जास्त असतो. यावर अनेक गमतीशीर मिम्स व्हायरल होत असतात. पण आता मुली नाहीतर चक्क कुत्र्याला पाणीपुरी खाण्याचे वेड लागले आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा चक्क पाणीपुरीवर ताव मारताना दिसतोय.
शेतकऱ्यांना दिवसाच वीज मिळावी; युवासैनिक आक्रमक
विशेष म्हणजे व्हिडीओ शुट करणारा व्यक्ती कुत्र्याला पाणीपुरीचे पाणीही प्यायला द्या असे सांगत आहे. हा व्हिडीओ धीरज चाब्रा या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
७० वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली १९ वर्षांची तरुणी; लव्हस्टोरी वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट लिहिले की, “पाणीपुरी कुत्र्याच्या आरोग्यासाठी चांगले नसते”, त्याचबरोबर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “पाणीपुरी खाल्ल्याने कुत्र्याची तब्येत बिघडू शकते”. अशा अनेक वेगेवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत. काहींनी अनेक गमतीशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त संजय राऊत भावूक; जुना फोटो शेअर करत म्हणाले…