Site icon e लोकहित | Marathi News

ड्रायव्हर बनला रक्षक! चालकाने थेट चालू बसमधून उडी मारत वाचवले 34 जणांचे प्राण

The driver became a guard! The driver saved 34 lives by jumping directly from the moving bus

दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. बारामतीच्या मोरगाव येथील खासगी क्लासेसची सहल गेली होती. यावेळ बसचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे भिषण अपघात झाला असता. परंतु, बस चालकाच्या कामगीरीमुळे हा अनर्थ टळला आहे.

चिंचवड-कसबा पोटनिवडणुक महाविकास आघाडी लढवणार आणि जिंकणारही, संजय राऊतांचे वक्तव्य चर्चेत

34 विद्यार्थ्यांनी भरलेली ही बस मांढरदेवचे दर्शन करुन माघारी आली. त्यानंतर बस वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर जात होती. तेव्हा अचानक ब्रेक निकामे झाले. ही गोष्ट बस चालकाच्या लक्षात आली. त्यावेळी बस चालकाने तात्काळ बसमधून खाली उडी मारुन बसच्या चाकाखाली दगड टाकून ही बस अडवली.

दरम्यान, ही घटना पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. या बसचा क्रमांक MH12 HC 9119 आहे. तर एअर पाईप फुटल्यामुळे हा अपघात झाला असता. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

“आता तरी बालिशपणा सोडा”, राम शिंदे यांची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका

बस चालकाच्या कामगीरीमुळे सर्व विद्यार्थ्यां आणि शिक्षक सुखरूप आहेत. त्यामुळे बस चालकाचे कौतुक केले जात आहे. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीचे निवारण पोलिसांनी केले.

यानंतर बसची दुरुस्ती करण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यां आणि शिक्षक यांना सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. त्याच वेळी हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. नेटकरी बस चालकाच्या धाडसी वृत्तीचे कौतुक करत आहेत.

चिंचवड-कसबा पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांना फोन, चर्चांना उधाण

Spread the love
Exit mobile version