भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता त्याच्यावर उपचार झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याच्या बाहेर आहे. दरम्यान बसचा चालक सुशील आणि कंडक्टर परमजीत यांनी ऋषभ पंतला अपघातातुन वाचविले यामुळे आता दोघांनाही सन्मानित करण्यात आले आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला म्हाताऱ्यांची तुफान गर्दी; खुर्च्या, बॅरिकेट्स तोडून केला डान्स
दरम्यान ऋषभ पंतला भेटण्यासाठी क्रिकेट असोसिएशन डीडीसीए टीम रुग्णालयामध्ये पोहोचली आहे. यावेळी डीडीसीएचे संचालक शायम शर्मा यांच्याशी बोलत असताना पंतने अपघाताबाबत एक खुलासा केला आहे. यावेळी ऋषभ पंत म्हणाला, “गाडी चालवत असताना मला झोप लागली नव्हती तर समोर एक खड्डा आला. आणि तो खड्डा वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला.”
“हे वर्ष कटू आणि गोड आठवणींनी…”, एकनाथ शिंदेंची ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत
माहितीनुसार, या अपघातामध्ये ऋषभच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी देखील केली जाणार आहे.
अपघाताबाबत ऋषभ पंतचा मोठा खुलासा; म्हणाला, “झोप लागल्यामुळे नाही तर…”