मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अलका कुबल-आठल्ये होय. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट ‘चक्र’ हा आहे. अलका कुबल-आठल्ये यांचे नाव मनोरंजन विश्वात अगदी आदराने घेतले जाते. सध्या सोशल मीडियावर अलका कुबल यांची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
अखेर राखीच्या नवऱ्याने सोडले मौन; म्हणाला “मला सुशांतसिंह राजपूत…”
अभिनयाच्या जोरावर अलका कुबल-आठल्ये यांनी प्रत्येक घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. अलका कुबल यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांना दोन मुली आहेत. अलका कुबल त्यांच्या मुलींविषयी माहिती देताना सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असतात.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; उमेदवारांचे चित्र होणार स्पष्ट
अलका कुबल यांचे पती सिनेमेट्रोग्राफर समीर आठल्ये आहेत. तर त्यांची पहिली मुलगी ईशानी पायलट आहे. अलका कुबल यांनी सोशल मीडियावर त्यांच्या धाकट्या मुलीविषयी माहिती देत पोस्ट केली आहे. त्यामुळे ती पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अलका कुबल यांनी नुकतीच त्यांची धाकटी मुलगी कस्तुरी हिच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोस्ट करताना लिहिले की, “कस्तुरीने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यक्षस्वीपणे पास केली. आजपासून ती डॉ. कस्तुरी आठल्ये आहे. आम्हाला तुझा खुप अभिमान वाटतो. तुला खूप खूप शुभेच्छा.”
मोठी बातमी! रामदेव बाबा यांच्याविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, अलका कुबल यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे अलका कुबल यांनी केलेल्या या भावनिक पोस्टवर कमेंट आणि लाईकचा पाऊसच पडत आहेत. आता ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
अखेर राखीच्या नवऱ्याने सोडले मौन; म्हणाला “मला सुशांतसिंह राजपूत…”