प्रियकरासाठी चक्क मोठ्या बहिणीने केली लहान बहिणीची हत्त्या

The elder sister killed her younger sister for her lover

अहमदनगर: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोपरगावमध्ये (Kopargaon) एक धक्कादयक घटना घडली आहे. मोठ्या बहिणीने (big sister) लहान बहिणीची हत्त्या केली आहे. लहान बहिणीने (little sister) मोठ्या बहिणीच्या प्रेम प्रकारणाबद्दल घरच्यांना माहिती दिली तसेच प्रियकरासोबत (boyfriend) पळून जाण्यास‌ विरोध केल्याच्या रागातून मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी बहिणीला बेड्या (Police Arrested Sister) ठोकल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22 कोटींची नुकसान भरपाई

नेमकी घटना काय घडली

30 सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गावात 17 वर्षीय मुलीचा मृतदेह घरात लटकलेला आढळून आला होता. सुरुवातीला सगळ्यांनाच ही आत्महत्या वाटत होती. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. या तपासात ही
आत्महत्या नसून हत्या झाल्याचे उघड झाले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी केली. या तपासात मृत मुलीच्या मोठ्या बहिणीनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मोठ्या बहिणीला अटक केली आहे. सृष्टी बनकर असे 19 वर्षीय आरोपी बहिणीचे नाव आहे. तिने पोलिसांनी केलेल्या चौकशीत लहान बहिणीची हत्त्या केल्याची कबुली देत कारणही स्पष्ट केले.

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान पुरात 8 जण बुडाले तर 40 लोक बेपत्ता

आरोपी सृष्टीचे श्रीरामपूर तालुक्यातील आकाश कांगुणे नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान सृष्टी प्रेमी आकाशसोबत
पळून जाऊन लग्न करणार होती. परंतु पळून जाण्याआधीच हे सगळ सृष्टीच्या लहान बहिणीला समजले. तिने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर घरच्यांनी सृष्टीला समजावून सांगितले होते. इतकंच नाही तर तिला काही दिवस कॉलेजला जाऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली होती. याच रागातून आणि प्रेमात आंधळी झालेल्या सृष्टीने काहीच विचार न करता बहिणीची हत्या केली.

Priya Prakash: डोळा मारून सगळ्यांना वेड लावणाऱ्या प्रिया प्रकाशचे बोल्ड फोटो व्हायरल, पाहा एका क्लिकवर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *