
शिवसेना पक्ष कुणाचा? आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) याबाबत महत्त्वाची सुनावणी झाली. यावेळी दोन्ही गटातील वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र शिवसेना (Shivsena) कोणाची आणि धनुष्यबाण कोणाला द्यायचा याबाबत सस्पेन्स अजून कायम आहे. आता याबाबत निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने दोघांची बाजू ऐकून घेऊन एक निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग! राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अंधेरी कोर्टात केलं हजर
आता या प्रकरणावर सुप्रिम कोर्ट आधी निकाल देईल. आणि मग त्यांनतर निवडणूक आयोग निकाल देईल, असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे. तर ठाकरे गटासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.
देवेंद्र फडणवीसांनी घेतली सूत्रे हातात; कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी
ठाकरे गटाने सुप्रिम कोर्टाच्या आधी निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, अशी मागणी केली होती. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी दिलासदायक मानला जात आहे.
बिग ब्रेकिंग! आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली नाही; पोलिसांचा दावा
जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत आपण निर्णय देणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केले आहे आहे. आता सुप्रिम कोर्टामध्ये १४ फेब्रुवारीला याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.
तो अपघात नसून घातपातच! पत्रकाराला रिफायनरी समर्थकांविरोधात बातमी देणे पडले महागात