Abhishek Ghosalkar । ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या (Abhishek Ghosalkar Murder) केल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडून आरोपी मॉरीस नरोना (Maurice Narona) यानेही स्वत:वर झाडल्या आहेत. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरु असून घोसाळकरांच्या हत्येचं नेमकं कारण समोर आले आहे. (Latest marathi news)
Buldhana Bus Accident । एसटी-बस आणि ट्रकचा भीषण अपघात, एकजण जागीच ठार तर १५ प्रवासी गंभीर जखमी
पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या रागातून मॉरिस नरोना याने ही हत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत काही कारणं देखील समोर आली आहे. नरोना विरोधात मुंबईच्या एमएचबी पोलीस ठाण्यात कलम 376 नुसार बलात्कार आणि 509 विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेला अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल असून बलात्काराप्रकरणी मॉरिसला अटक करण्यात आली होती.
अगोदर मैत्री केली अन्…
इतकेच नाही तर तो काही महिने पुण्याच्या येरवडा कारागृहात बंद होता. या दोन्ही गुन्ह्यात अभिषेक घेसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याची मॉरिसची धारणा असल्याने त्यातून त्यांच्यातील वैर वाढले, असा पोलिसांना संशय आहे. मॉरीसने जेलमधून बाहेर येताच दोघांमधील वाद मिटल्याचा बनाव करून पुढे काही दिवस अभिषेक घोसाळकरांबरोबर जवळीक वाढवण्यास देखील सुरुवात केली.
अभिषेक यांच्या वाढदिवसाला मॉरिसने परिसरामध्ये बॅनरबाजी केली होती. त्यामुळे अभिषेक यांचा त्याच्यावर विश्वास बसला. मॉरिसने गुरुवारी साडी वाटपाच्या निमित्ताने अभिषेक घोसाळकरांना आपल्या कार्यालयात बोलावलं. त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह करून आपल्यातील वाद संपले असल्याचे दाखवले आणि प्लॅन करून अभिषेक घोसाळकरांची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.
Abhishek Ghosalkar | गोळीबारात मृत्यू झालेले अभिषेक घोसाळकर नेमके कोण आहेत?