कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. अनेक शेतकरी वर्ग कांदा पिकामध्ये रोटाव्हेटर फिरवताना दिसत आहे. यामध्येच आता होळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी कांद्याची होळी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातून समोर आला आहे. कांदा उत्पादनातून खर्च सुद्धा निघत नाही यामुळे शेतकऱ्याने दीड एकरवरील कांद्याची होळी केल्याची माहिती समोर आली आहे.
खळबळजनक घटना! डॉक्टर-नर्स उपस्थित नसल्याने आरोग्य केंद्रात आईनेच केली मुलीची प्रसूती
कृष्णा डोंगरे अस या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नाव असून मागच्या पंधरा दिवसांपूर्वी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केल्याची पत्रिका देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाली होती. या समारंभास मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. आणि आज अखेर होळीच्या दिवशी सरकारच्या धोरणाला वैतागून शेतकऱ्याने कांद्याला अग्निडाग दिला आहे. या शेतकऱ्याने जवळपास दीड एकर कांद्याला अग्निडाग दिला आहे.
रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून पिकाला योग्य भाव मिळत नाहीत. खर्चही निघत नाही, कांदा विकून फक्त १ रुपया मिळतोय या सर्वांमुळे शेतकरी राजा चांगलाच चिंतेत आहे.
“तुम्ही फडणवीस साहेबांना शोभत नाही मॅडम”, ‘त्या’ फोटोवरून अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल