
मुंबई : महाराष्ट्रामध्ये सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक विजू माने यांच्या घरी देखील गणपती असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजू मानेंच्या (Viju Mane) घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले आहे. या संदर्भातील माहिती विजू माने यांनी सोशल मीडिया पोस्ट द्वारे दिली आहे.
विजू माने यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर त्यांचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, खरंतर माझ्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी ते येतात. पण यावर्षी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते त्यामुळे मनात कितीही वाटत असलं तरी ते येतील का याबद्दल शंका होती. पण खरंच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे माझ्या घरी आले. मनमोकळ्या गप्पा मारल्या. सोबत खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते, आमचे मित्र नरेश म्हस्के हेसुद्धा होते (दरवर्षी प्रमाणे).
Gulkand: गुलकंद खाल्ल्याने शरीरास होतात हे फायदे; वाचा सविस्तर
खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी देखील कितीही उशीर झाला तरी माझ्या घरच्या बापाचं दर्शन घेण्याची आपली सवय मोडली नाही. ( मला चांगलं आठवतंय गेल्यावर्षी रात्री दीड वाजता खासदार माझ्या घरी आले होते. आणि तेव्हाही जवळपास अर्धा तास अत्यंत छान चर्चा झाली होती.)…. प्रत्येक जवळच्या माणसाच्या, कार्यकर्त्याच्या….खरंतर आमंत्रण देणाऱ्या कुणाच्याही घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे ही स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली शिकवण आहे.
राजकारणातील उलथापालथ हा प्रत्येकाच्या चर्चेचा आवडीनिवडीचा विषय असतो. पण आपल्यासाठी तो माणूस महत्त्वाचा असतो जो आपल्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेला धावून आलेला असतो. माझ्या बाबतीत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे ते स्थान आहे. आणि मी कृतज्ञता (मराठीत gratitude) व्यक्त करण्याला कायम प्राधान्य देणारा माणूस आहे. मला शक्य तेव्हा, शक्य तिथे, शक्य त्या कार्यक्रमात मी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानत असतोच. या शिवाय गेली अनेक वर्ष मी त्यांना ओळखतोय. सामान्य माणसात मिसळून धडाडीने काम करण्याचा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांच्या धाडसाची बरोबरी करू शकेल असा एकही नेता मी पाहिलेला नाही.
महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली त्यावेळी पुरात उतरून त्या रेल्वेत पोहोचून प्रवाशांना धीर देणे, सांगली कोल्हापूरच्या पुरात अगदी खांद्याइतक्या पाण्यात उतरून पूरग्रस्त लोकांच्या जवळ जाऊन त्यांना मदत करून भविष्यासाठी आश्वस्त करणे आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे ज्याकाळी माणूस शिंकला तरी पाचावर धारण बसायची अशा काळात पीपीई किट घालून स्वतः करोना रुग्णांना आधार द्यायला त्यांच्या प्रत्यक्ष जवळ पोहोचणारे नेते किती होते हे आठवून पहा.मी आणि माझा मित्र संदीप वेंगुर्लेकर आम्ही नेहमी म्हणतो, “तसं पाहिलं तर आपल्याला सगळेच राजकारणी सारखेच. अनेक पक्षातल्या अनेक नेत्यांशी छान संबंध आहेत. राजकारण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असावं पण सन्मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ह्या माणसात अशी काहीतरी जादू आहे की त्यांच्यासाठी आपण ‘काहीही’ करू शकतो. असे त्यांनी लिहिले. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेळीपालन व्यवसायासाठी ‘या’ बँका देणार लोन