कांद्याला भाव नसल्याने संतापून शेतकऱ्याने कांद्यावरच काढले नरेंद्र मोदींच चित्र

The farmer drew Narendra Modi's picture on the onion as he was angry that there was no price for the onion

नाशिक: सध्या कांद्याचे (Onion) दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. आता एक आगळीवेगळी बातमी समोर आली आहे. आता एका शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendr Modi) यांच्याकडे कांद्याच्या दराबाबत वेगळ्या पद्धतीने मागणी केली आहे.

मत मागायला आल्यास अपमान करण्यात येईल; बारामतीमध्ये अनोख्या फ्लेक्सची जोरदार चर्चा

नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीच चित्र काढलं आहे. त्याचबरोबर अजून दुसऱ्या कांद्यावर दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांचं देखील चित्र काढले आहे. या शेतकऱ्याची कमाल सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

नाशिकच्या महंतांच शरद पवारांना आव्हान; म्हणाले, “दत्त उपासना करा”

सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. सध्या कांद्याला कोंब फुटले तरीदेखीलसरकारला अद्याप जाग आली नाही. म्हणून शेतकऱ्याने कांद्यावर नंतर मोदी यांचे चित्र काढले अशी माहिती शेतकऱ्यानेच दिली आहे.

बारामतीत धक्कादायक प्रकार! महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लुटलं नंतर काढले नग्न फोटो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *