मुलांचे सर्व लाड पुरवण्यासाठी आईवडील दिवसरात्र मेहनत घेत असतात. आपल्या मुलांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करून मोठे व्हावे अशी त्यांची इच्छा असते. यासाठी ते मुलांना कुठलीही कमी पडू देत नाहीत. एकवेळ जमीन गहाण ठेवतात पण आपल्या लेकरांच स्वप्न परिस्थितीसमोर गहाण पडू नये यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत असतात. बीडच्या सुनील तोडकर यांनी असेच केले आहे. आपल्या मुलाने यशस्वी कुस्तीपटू व्हावे, यासाठी सुनील तोडकर यांनी आपली 5 एकर जमीन विकली.
अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला दिल्याने पोलिसांकडून थेट पालकांवरव कारवाई
सुनील तोडकर यांचा मुलगा पै. अतिश तोडकर याने देखील आपल्या वडिलांचे प्रयत्न वाया न जाऊ देता मोठे यश मिळवले आहे. पुणे ( Pune) येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari) स्पर्धेत पै. अतिश तोडकर याने सुवर्णपदक मिळवले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील अतिशला यशस्वी कुस्तीपटू बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी आपल्या 9 एकर जमिनीपैकी 5 एकर जमीन विकली. कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी अतिशलाला आळंदी येथील दिनेश गुंड यांच्या तालमीत घालण्यात आले.
मला देवावर विश्वास आहे, धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनाच मिळणार; नवनीत राणांचे वक्तव्य चर्चेत
यानंतर तो दिल्ली येथील वीरेंद्र स्पोर्ट्स अकॅडमी येथे होता. दिल्ली सारख्या ठिकाणी पैलवानांच्या खुराकावर भरपूर खर्च येतो. अतिशला देखील भरपूर खर्च येत होता. हा खर्च भागवण्यासाठी सुनील तोडकर यांनी जमीन विकायचे ठरवले. याचेच फळ म्हणून अतिश महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सुवर्णपदकाचा ( Gold medalist) मानकरी झाला आहे. ही राज्यस्तरीय मनाची स्पर्धा जिंकल्याने त्याला पदकासह जावा गाडी सुद्धा मिळाली आहे. अगामी काळात देशासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मेडल मिळवणे हे अतिशचे ध्येय आहे.
मला देखील स्वतःला संपवू वाटले होते; संजय दत्तने उलगडले कर्करोगाच्या प्रवासाचे किस्से