
आपल्या आहारात कांद्याला विशेष महत्त्व आहे. इतकंच नाही तर बहुतेक भाज्या बनवण्यासाठी कांदा लागतोच. हाच कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन पाणी काढत आहे. दिवसेंदिवस कांद्याचे दर (Onion rates) घसरताना दिसत आहेत. कांद्याची देशांतर्गत मागणी सध्या कमी आहे. त्यात निर्यातीला सुद्धा ग्रहण लागले आहे. यामुळे कांद्याचे दर घसरले असून शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पडून आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतातुर झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल (Viral Video) होतोय.
माजी राज्यपालांनी उद्धव ठाकरेंची लायकी काढली; म्हणाले, “ही व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या…”
या व्हिडीओमध्ये एक मध्यमवयीन शेतकरी कांद्याच्या शेतात उभा राहून स्वतःलाच मारुन घेत आहे. कांदा का लावला म्हणून हा शेतकरी संतापला आहे आणि तो स्वतःलाच कानाखाली मारून घेत आहे. या व्हिडीओ सोबत ‘लावचिन का कांदा? ‘ असा प्रश्न देखील विचारला गेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“मूर्ख व्यक्ती सत्तेत आली की…”, संजय राऊतांच ते ट्विट चर्चेत
@andhale_baburav या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून अवघ्या चार दिवसांत या व्हिडीओला 90 हजारांच्या पुढे लाईक्स मिळाले आहेत. ‘हे सुद्धा दिवस जातील. थोडा धीर धरा. हार मानू नका.’ अशा आशयाच्या प्रतिक्रिया लोकांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. तर काही लोक या शेतकऱ्याला हसत आहेत. परंतु, हतबल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे या व्हिडीओने लक्ष वेधले आहे.
माजी राज्यपालांनी उद्धव ठाकरेंची लायकी काढली; म्हणाले, “ही व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या…”