शेतकऱ्याला जगाचा ‘पोशिंदा’ असे म्हणतात. शेतकरी शेतात धान्य पिकवतो त्यामुळे सर्वांचे पोट भरत असते. परंतु, याच शेतकऱ्यांना कायम काही ना काही सहन करावे लागत असते. शेतकरी रोज नव्या अडचणींना सामोरे जात असतात. कधी नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिकांना न मिळणारा भाव, व्यवस्थेतील इतर घटकांकडून होणारी पिळवणूक यामुळे शेतकरी ( Farmers) हतबल होत असतात. सांगलीमधील एका शेतकऱ्याने तर चक्क शेतात आलेल्या अधिकाऱ्याचे पाय धरल्याची घटना सध्या घडली आहे.
बिग ब्रेकिंग! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; ‘या’ ठिकाणी लॉकडाऊनही केलं
सांगली ( Sangli) येथील भोसे जाधव वस्तीवरील शेतकरी मागील तीन- चार वर्षांपासून स्टोन क्रशरच्या ( Stone crusher) धुळीमुळे त्रस्त आहेत. यामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. यासंबंधी या शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रार देखील केली होती. याची माहिती घेण्यासाठी प्रदूषण महामंडळाचे अधिकारी नुकतेच शेतात येऊन गेले तेव्हा शेतकऱ्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले. आपली व्यथा मांडताना या शेतकऱ्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.
डिझेलचा टँकर व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; तब्बल दीड तास सुरू होता अग्नितांडव
यातील एका शेतकऱ्याने तर चक्क अधिकाऱ्याचे पाय धरले व आमची अडचण दूर न केल्यास जीवाचे काहीतरी बरे-वाईट करून घेऊ असा इशारा दिला. यावेळी प्रदूषण मंडळांच्या अधिकाऱ्यांनी शेती व स्टोन क्रशर यांचा पंचनामा केला व लवकरात लवकर उपाय योजना करण्यात येतील. असे आश्वासन दिले.