Site icon e लोकहित | Marathi News

महावितरण अधिकाऱ्याशी फाडफाड इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या शेतकऱ्याला मिळाला मीटर!

The farmer who spoke in broken English to the Mahavitran officer got a meter!

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मागच्या दोन दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ आता व्हायरल ( Viral video) होतोय. ज्यामध्ये एक वयोवृद्ध शेतकरी चक्क इंग्रजी मध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यासोबत बोलत आहे. या व्हिडीओ मध्ये शेतकरी आजोबा (Old Farmer) आपल्या अडचणींचा पाढा अधिकाऱ्यासमोर वाचत आहेत.

मोठी बातमी! आमदार शहाजीबापूंच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा भीषण अपघात; १ जागीच ठार

व्हायरल झालेला हा व्हिडिओ सांगली मधील आटपाडी तालुक्यातील आहे. सध्या महावितरणचे पथक वीजचोरी रोखण्यासाठी काम करत आहे. अशातच एक पथक आटपाडी मधील वाडी गावात दाखल झाले, तेव्हा एका शेतकरी आजोबांनी कृषिपंपासाठी वीजेची चोरी केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी आजोबांना जाब विचारण्यास सुरुवात केली.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह उतरणार मैदानात!

दरम्यान, आजोबांनी देखील न डगमगता इंग्रजी (English) मधून आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी वीज कनेक्शन साठी कोणत्या अडचणी येतायत याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी देखील शांतपणे आजोबांचे बोलणे ऐकून घेतले आहे. आता महावितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नाची दखल घेतली असून आज त्या शेतकऱ्याला महावितरणकडून वीज जोडणी देण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्याने देखील महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

माध्यमांशी बोलताना ढसाढसा रडत राखी सावंत म्हणाली; “मैं एक जिंदा लाश हूं”

Spread the love
Exit mobile version