
दिवसेंदिवस तंत्रज्ञान अधिक प्रगत होत चालले आहे. वेळेची व कष्टाची बचत होण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन होत आहे. आता हे डिजिटलायझेशन ( Digitalization) शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आले आहे. राज्यशासनाने नुकताच याबाबत मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जमिनीचे डिजिटल नकाशे ( Digital land Maps) उपलब्ध होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील 13 प्रकारच्या भूमापन जमिनीचे नकाशे आता डिजिटल स्वरूपात पाहता येणार आहेत.
दूधवाला म्हणून महिलांची लूटमार करणारी बारामतीतील टोळी जेरबंद
राज्य सरकारने शुक्रवारी (दि.16) हा निर्णय घेतला असून याचा सर्वात जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. खरंतर राज्यात 6 ऑक्टोंबर 2015 पासूनच जमीनीचे डिजीटायझेशन करण्यास सुरुवात झाली होती. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘ई- नकाशा’ ( E- Maps) प्रकल्पाअंतर्गत जमिनीच्या नकाशांचे डिजीटायझेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार सध्या राज्यातील 6 जिल्ह्यामधील 13 प्रकारच्या भूमापन नकाशांचे डिजीटायझेशनचे काम करण्यात येणार आहे. हे काम खाजगी संस्थेमार्फत करण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान भूमापन नकाशे डिजिटल झाल्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. उत्तरप्रदेश मध्ये देखील केंद्र सरकारच्या स्वामित्त्व योजनेअंतर्गत जमिनींचे नकाशे डिजिटल करण्यात आले आहेत. यासाठी तेथे ड्रोन मॅपिंग देखील करण्यात आले होते.
बिग ब्रेकिंग! शरद पवार महाविकास आघाडीच्या महामोर्चाल राहणार उपस्थित