Farmer News । मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा केविलवाणा प्रयत्न, चक्क बाटलीने पाजले पाणी

The farmer's desperate effort to save the chilli crop, water from a bottle

Farmer News । धाराशिव : राज्यात यावर्षी पावसाचे उशिरा आगमन (Rain in Maharashtra) झाले, त्यात त्याने काही भागाकडे पाठ फिरवली आहे. राज्याच्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) दडी मारल्याने आता पावसाअभावी हाताशी आलेली पिके जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पिके वाचवण्यासाठी त्यांचे केविलवाणे प्रयत्न सुरु आहेत. (Farmer News Maharashtra)

Agri News । संत्री उत्पादक शेतकरी फळगळतीमुळे संकटात, सरकारकडून मदतीची अपेक्षा

धाराशिव जिल्ह्याकडेही पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पिके कशी वाचवायची असा प्रश्न पडला आहे. धाराशिवमधील बावी येथील राठोड कुटुंबीय शेतातील लावलेली मिरची (Chilli crop) वाचवण्यासाठी पाण्याच्या बाटल्यातून पिकांना पाणी देत आहेत. जर येत्या काही दिवसात या भागात पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट येईल. (Chilli crop destroyed)

Santosh Bangar । सर्वात मोठी बातमी! संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, ‘ती’ चूक पडली महागात

दरम्यान परभणी जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 28 टक्के पाऊस झाला आहे. त्याचा पिकांवर परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे जिल्ह्यातील धरणाची स्थिती समाधानकारक नाही. तर नांदेडमध्ये हळद या पिकावर पांढरे चट्टे पडायला सुरुवात झाली आहे. पांढरे चट्टे पडल्यामुळे पानाला छिद्र पडत आहेत. त्यामुळं हळद पिकाची वाढ खुंटत चालली आहे.

Babanrao Pacchpute । शेतकऱ्यांसाठी आमदार बबनराव पाचपुते करणार उपोषण

निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील पाऊस लांबणीवर पडला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढत आहे. अशातच आता राज्यभरात 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान हलक्या पावसाच्या सरी कोसळतील. त्याशिवाय पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Crime News । त्याचा अपघातात मृत्यू झालाय असं सगळ्यांना वाटलं पण २ वर्षांनी चिमुरड्याने आणले आईचं घाणेरडं सत्य बाहेर

Spread the love