
बाप ( Father) म्हणजे मुलींसाठी हिरो असतो! मुळात वडील आणि लेकीचे नातेच अतिशय जवळचे असते. कुठल्याही संकटांला सामोरे जाताना मुलींना वडिलांचा आधार वाटतो. मात्र याच बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जयपूर मध्ये घडली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या वडिलांनी दारू पिण्यासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी एका चार वर्षाच्या लहान मुलीला ( 4 Year girl child) गहाण ठेवले आहे. ‘कर्जाची रक्कम वसूल झाल्यानंतर मुलीचा ताबा द्या’, असे वडिलांनी सांगितले आहे.
भाजपच्या पराभवावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुन्हा एकदा विकास आणि…”
जयपूर मधील एक व्यक्ती त्याची पत्नी व दोन मुलांसोबत राहतो. ही व्यक्ती भंगार गोळा करून विकण्याचा व्यवसाय करते. मात्र या व्यक्तीला दारू पिण्याचे भयंकर व्यसन आहे. दारूची ( Liquior) नशा करण्यासाठी याने एका व्यक्तीकडून पैसे उसने घेतले. मात्र हे पैसे त्याला फेडता आले नाहीत. त्यामुळे उसने पैसे देणाऱ्या व्यक्तीने वसुलीसाठी सतत तगादा लावला होता.
यावेळी दारू पिणाऱ्या व्यक्तीने आपल्या चार वर्षांच्या मुलीला कर्ज देणाऱ्या व्यक्तीकडे गहाण ठेवले. मुलीला भीक मागायला लावून तिच्याकडून कर्ज वसूल करून घ्या. असे त्या व्यक्तीने कर्जदात्याला सांगितले. त्यानंतर त्या लहान मुलीने रोज भीक मागून १०० रुपये जमवले आणि आतापर्यंत कर्जदात्याला ४५०० रुपये जमवून दिले आहेत. भीक मागणाऱ्या मुलांचे समुपदेशन केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.
Bollywood | बॉलिवूड मधील सासऱ्याची आणि सुनेची ‘ही’ अधुरी प्रेम कहाणी वाचून तुम्हालाही होईल दुःख!