Site icon e लोकहित | Marathi News

रानजनावरांची भीती, रात्रीची वीज, बळीराजाची परिस्थिती आहे तशीच!

The fear of wild animals, night lightning, Baliraja's situation is the same!

राज्यातील शेतकरी एकामागोमाग एक नैसर्गिक संकटांचा सामना करत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या उत्पादनाला देखील हवा तसा दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. एवढंच नाही तर सध्याच्या रब्बी हंगामात ( Rabbi Season) शेतकरी याव्यतिरिक्त आणखी कितीतरी समस्यांना सामोरे जात आहेत. परंतु सध्या नागपूर ( Nagpur) येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात याबाबत थोडी देखील चर्चा झालेली नाही. राजकीय आरोप- प्रत्यारोप, भ्रष्टाचार, हत्या प्रकरण याशिवाय अधिवेशनात इतर प्रश्नांवर चर्चा झालेली दिसून येत नाही.

शरद पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी होणार? लवासा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

महावितरणने सुरू केलेले वीज भारनियमन शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बाब बनत आहे. महावितरणकडून शेतीसाठी दिवसा वीज सोडली जात नाही. याचा फटका शेतकऱ्यांना (Farmers in trouble) बसत आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असून रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी असते. अशावेळी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी पाजण्यासाठी शेतात जावे लागते. एकीकडे सगळे लोक निवांत झोपेत असतात आणि शेतकरी मात्र कडाक्याच्या थंडीत रात्रीचे शेतात काम करतात.

मोठी बातमी! नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदींचे निधन

याशिवाय दिवसेंदिवस जंगली प्राण्यांचे मानवी वस्तीत शिरकाव करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या वेळी शेतात बऱ्याचदा बिबट्याचा वावर दिसत आहे. त्यामुळे रात्री शेतात पाणी पाजायला जाणारे शेतकरी जीव मुठीत ठेऊन काम करतात. तसेच या शेतकऱ्यांच्या घरचे देखील त्यांच्यासाठी चिंतेत असतात. मात्र शेतकऱ्यांच्या या अडचणींकडे सरकारचे लक्ष नाही. यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

पोलिसांसमोर मुलाने गायले गाणे आणि पुढे घडलं असं की…”, पाहा VIDEO

Spread the love
Exit mobile version