
‘भोला’ हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू हे दोघे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. दरम्यान या चित्रपटाचं चौथ्या दिवशीच बॉक्स ऑफिस कलेक्शन सामोरं आलं आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी ‘भोला’ने बॉक्स ऑफिसवर 14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत या चित्रपटाची कमाई 44.28 कोटी रूपये झाली आहे.
धक्कादायक घटना! बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी
चित्रपटाची रविवारपर्यंतची कमाई खालीलप्रमाणे –
गुरुवार- 11.20 कोटी रुपये
शुक्रवार- 7.40 कोटी रुपये
शनिवार- 12.20 कोटी रुपये
रविवार- 13.48 कोटी रुपये
पीकअप आणि इनोव्हा कारचा भीषण अपघात; ३ जण जागीच ठार
भोला चित्रपटाची कमाई दृश्यम 2 चित्रपटापेक्षा कमी असल्याचं बोलल जात आहे. दरम्यान, भोला हा चित्रपट तमिळ सिनेमा ‘कैथी’चा रिमेक असून अभिनेता अजय देवगणनेच दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दृश्यांची भव्यता दिसून आली होती.