Shivsena MLA Disqualification Case। शिवसेनेच्या (Shivsena) सत्तासंघर्षाचा पेच अजूनही सुटला नाही. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता या संदर्भात मोठी बातमी अपडेट समोर आली आहे. (Latest Marathi News)
Crime News । नकार जिव्हारी लागला! रागाच्या भरात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टवर…
आमदार अपात्रतेची सुनावणी (MLA Disqualification Case) नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घ्यायची की नाही, याबाबत येत्या 20 ऑक्टोबरला मोठा निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 13 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत कागदपत्रांची तपासणी होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तीवाद होईल. युक्तीवादानंतर दोन आठवड्यामध्ये अंतिम सुनावणी पार पडेल.
Eknath Shinde । ठरलं तर मग! लोकसभेची ‘ती’ जागा शिंदे गटालाच मिळणार
शिंदे गट आणि ठाकरे गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे निर्णय लवकर लागण्याची शक्यता आहे. या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निर्णयानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.