नागराज मंजुळे यांचे आतापर्यंतचे सगळेच चित्रपट चौकटी मोडणारे ठरले आहेत. सैराट, नाळ, फँड्री यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर त्यांचा ‘झुंड’ (Zund) हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यासारख्या बड्या अभिनेत्याची भूमिका, उत्तम पटकथा व भावणारी दृश्ये यामुळे या चित्रपटाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. झुंड चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली.
अन् आजी लागल्या रडू! संदीप पाठकचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
आता झुंड या चित्रपटाच्या यशानंतर नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा नवीन चित्रपट येत आहे. हा चित्रपट येत्या मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागराज मंजुळे यांनी नुकतंच एक मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी सांगितल्या.
‘या’ अख्ख्या शाळेत फक्त एक शिक्षक आणि एक विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा
यावेळी मुलाखतीत बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, “प्रेम हे प्रत्येकाला एकदा व्हायलाच पाहिजे. माझे देखील प्रेम माझ्या वडिलांना समजलं होत. त्यानंतर त्यांनी मला खूप मारलं होत पण मी माझ्या आत्यामुळे वाचलो. त्यावेळी माझे वडील माझ्या आत्या ला म्हणाले तुला माहिती आहे का याने काय केलंय? त्यावेळी आत्या वडिलांना म्हणाली तू खूप शहाणा होता का? हे एकूण मला खूप हसू आले. मला त्यावेळी समजलं की सर्वजण वयात आले की तेच करतात.” असे ते म्हणाले.
व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी ‘ही’ आहेत सर्वात बेस्ट ठिकाणे
त्याचबरोबर ते म्हणाले, “जर तुम्हाला आवडल तर कोणत्या जातीची आहे, ती कोण आहे, कुठल्या धर्माची आहे याचा अर्थ ते प्रेम स्वाभाविक नाही. व्यक्ती कोणत्या जातीचा, धर्माचा आहे त्यानंतर त्याच्या प्रेमात पडायचं. हे मला खूप जाणवत होतं”, असे देखील नागराज मंजुळेंनी सांगितले.
“तुम्हाला उपवास करूनही चांगली बायको मिळणार नाही” – गोपीचंद पडळकर