मुंबई : आज मराठा आरक्षणाच्या सुविधांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षण आणि सुविधा याबाबत शासन सकारात्मक असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ५० मुले आणि ५० मुली असे १०० विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरू करण्यात येणार आहे. असा निर्णय घेण्यात आलाय.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील 15 हजार शाळा होणार बंद
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देश-विदेशामधील महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबतचा प्रस्ताव विभागाने तयार करावा, अशा सूचना देखील देण्यात आल्या. मराठा समाजाच्या मुला-मुलींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून, व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. यासाठी आवश्यक तो निधी देखील उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी बँकांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही तारण घेऊ नये. यासाठी बँक गॅरंटीबाबतचा ठराव देखील उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
Disha Vakani: मोठी बातमी! ‘तारक मेहता’ फेम दिशा वकानीला गळ्याचा कॅन्सर
ज्यांना लाभ नाही पण त्यांच्या पालकांचे आठ लाखाच्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना ५० टक्के शैक्षणिक शुल्क परतावा देण्यात येणार आहे. यामध्ये ६४२ अभ्यासक्रमांचा समावेश असून या व्यतिरिक्त आणखी काही अभ्यासक्रमांचा समावेश करावयाचा असल्यास अभ्यासक्रमांची यादी शासनाकडे पाठवावी, अशा सूचना देखील या बैठकीमध्ये देण्यात आल्या.
परतीच्या पावसाने सोयबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान, बळीराजा चिंतेत
या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे इत्यादी उपस्थित होते.
Siddharth-Kiara: ठरलं! सिद्धार्थ-कियारा ‘या’ दिवशी करणार लग्न? तारीख आली समोर