पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपूल काल शनिवारी (saturday) मध्यरात्रीनंतर एक वाजता स्फोट घडवून जमीनदोस्त करण्यात आला आहे. पूल पाडण्यासाठी मागच्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, (National Highway Authority) पोलीस आणि तांत्रिक पथकाकाडून मोठ्या यंत्रणेच्या माध्यमातून तयारी करण्यात येत होती. त्याचबरोबर चांदणी चौक (Chandni Chowk) आणि परिसरात सकाळी आठवाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीये.
चांदणी चौकामध्ये कायम वाहतुकीची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती त्यामुळे हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. कमी वेळेमध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात नागरिकांना जास्त त्रास होऊ नये, आणि वाहतूक लवकरात लवकर चालू व्हावी यासाठी पूल स्फोटकाने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोची आणि नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या कंपनीलाच हा पूल पाडण्याचे काम देण्यात आले होते.
Milk: दुधाला FRP चं धोरण लागू करा, शेतकरी संघर्ष समितीची नव्या सरकारकडे मागणी
माहितीनुसार, पूल पाडण्यासाठी जवळपास सहाशे किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. तांत्रिक पथक शनिवारी सकाळपासून पूल पाडण्याच्या कामाची अंतिम तयारी करत होते. त्यामुळे शनिवारी रात्री सातारा आणि मुंबईकडून येणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आली. तांत्रिक पथकाला सूचना मिळताच काही सेकंदामध्येच दोन स्फोट घडवून पूल पाडण्यात आला.