Site icon e लोकहित | Marathi News

वनपथकाने चांगलीच जिरवली धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांची मस्ती; 5 हजारांचा दंडही केला वसूल

The forest team managed the fun of the frolicking tourists; A fine of 5 thousand was also recovered

सुट्टी म्हंटल की अनेकजण फिरायला जाण्यासाठी बाहेर पडतात. दरम्यान गुरुवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्प ( Tadoba Tiger Sentury) पर्यटकांनी गजबजून गेला होता. यापैकी काही पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात धिंगाणा घातला. मात्र, धिंगाणा घालणाऱ्या या लोकांना वनपथकाने चांगलेच वठणीवर आणले असून त्यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. इतकंच नाही तर पटकन या लोकांना बफर क्षेत्राच्या बाहेर हकलण्यात आले.

शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर जाणार? परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

त्याच झालं असं की, ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी, मोहर्ली- पद्मपुर मार्गावर भर जंगलात गाडीखाली उतरून वाहनातील म्युझिक सिस्टीम वाजवत धिंगाणा केला. यावेळी त्यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मोठमोठ्याने गाणे वाजवून, वाहनाखाली उतरून धिंगाणा घालण्यासही सुरुवात केली.

“तो माझा जावई नाही…”, सुनील शेट्टीचं केएल राहुलबद्दल धक्कादायक विधान

हा प्रकार वनपालांच्या लक्षात येताच, या घटनेची माहिती वनपथकाला देण्यात आली. दरम्यान वनपथकाला बघताच सुरुवातीला या पर्यटकांनी (Tourists) वाद घालण्याच्या प्रयत्न केला. परंतु, वनपथकाने कायदा आणि नियमांबद्दल बोलण्यास सुरुवात केल्याबरोबर पर्यटकांची बोलती बंद झाली. नंतर पर्यटकांनी दंड देखील भरला. दरम्यान हे पर्यटक परराज्यातील असल्याने त्यांना नियमांची माहिती न्हवती. त्यामुळे त्यांना दंड ठोकून सोडून देण्यात आले.

बाॅयफ्रेंडबद्दल आर्चीने केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘त्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही’

Spread the love
Exit mobile version