प्रेमसंबंधातून चुकीच्या घटना घडण्याचे प्रमाण आजकाल वाढले आहे. बिहारमध्ये (Bihar) सहा मुलांच्या आईने आपल्या विवाहबाह्य संबंधांमुळे पतीचा खून केल्याचे समोर आले आहे. गोपालगंज जिल्ह्यातील लाधपूर येथे ही घटना घडली आहे. याठिकाणी २२ मे रोजी मासे व्यापारी मोहम्मद मियाँ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. (Wife kills husband for her extramarital affair)
बापरे! भर रस्त्यामध्ये ‘या’ व्यक्तीने केला उर्फी जावेद हिला प्रपोज
मोहम्मद मियाँ व त्यांची पत्नी नूरजहाँ खातून यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दोघांना एकूण ६ मुले आहेत. दरम्यान मोहम्मद मियाँ बराच काळ अमेरिकेत राहत होता. याकाळात त्याची पत्नी नूरजहाँ हिचे नौशाद आलम या व्यक्तीसोबत मागील २१ वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते.
“भाजपच्या तमाशातला नाच्या”, नितेश राणे यांच्यावर ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने केली खरमरीत टीका
यावरून मोहम्मद मियाँ आणि नूरजहाँ खातून यांच्यात बऱ्याचदा वाद व्हायचे. एवढंच नाही तो व्यापारी आपल्या पत्नीला मारहाण करायचा. यामुळे त्याच्या पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचला. यासाठी तिने कॉन्ट्रॅक्ट किलर मन्सूर आलम आणि परवेझ आलम यांना ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती.
ब्रेकिंग! शिंदे गटाच्या दोन आमदारांचा अपघात! डंपरने दिलेल्या धडकेत कारचा चक्काचूर
ज्या रात्री सुपारी किलरने महिलेच्या पतीला मारले, त्यावेळी ती मोबाईलवर सुपारी किलरशी बोलत खिडकीतून बाहेर बघत होती. यावेळी मारेकऱ्यांनी तिच्या समोरच तिच्या पतीची हत्या केली. गोळी झाडल्यानंतर पती मोठ्याने ओरडत होता, तो आवाज महिलेने फोनवर ऐकला होता.
शुभमन-साराचा ब्रेकअप? गिलचा ‘तो’ व्हिडीओ पुन्हा एकदा होतोय व्हायरल
पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी मारेकऱ्यांकडून ७५ हजार रुपये, एक पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे, ५ मोबाईल आणि एक मोटारसायकल इत्यादी गोष्टी जप्त केल्या.
तब्बल २२ वर्षांनंतर सासू आणि जावयाचे अफेअर उघडकीस, वाचून तुम्हालाही बसेल धक्का