दिल्ली : नोएडातील ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे महाकाय ट्विन टॉवर्स (Twin Tower) पाडण्यात आले आहेत.हे ट्विन टॉवर्स पडल्याने आजूबाजूच्या परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. या महाकाय ट्विन टॉवर्सचे बांधकाम अनधिकृत होते.‘एपेक्स’ ही इमारत ३२ मजली तर ‘सेयान’ २९ मजल्यांची इमारत होती. या टॉवर्सची उंची १०० मीटर लांब म्हणजेच कुतुबमिनारापेक्षाची जास्त होती. नोएडातील (Noida) सेक्टर ९३ A मधील ‘एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण’ प्रकल्पातील या टॉवर्समध्ये ८५० फ्लॅट्स होते.
Nitin Gadkari: “मी विहिरीत उडी मारुन मरुन जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही” – नितीन गडकरी
दरम्यान तब्बल ३ हजार ७०० किलो स्फोटकांचा वापर करून हे ट्विन टॉवर्स पाडण्यात आले आहेत.तसेच हे ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी नोएडा परिसरात ५६० पोलीस, १०० राखीव दलाचे जवान आणि चार एनडीआरएफच्या (NDRF) टीम तैनात करण्यात आल्या होत्या.तसेच हे टॉवर्स पाडण्याआधी जवळच्या सगळ्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. ट्विन टॉवर परिसराचा जवळपास ५०० मीटरचा भाग सील करण्यात आला होता.९ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२१ रोजी हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते.
Sonali Phogat: सोनाली फोगट हत्याप्रकरणी अंमली पदार्थ विक्रेत्यासह ५ जणांना अटक
अस उभारण्यात आल ट्विन टॉवर
२००५ मध्ये ‘सुपरटेक’ कंपनीला न्यू ओखला औद्योगिक प्राधिकरणाने ९ मजल्यांचे १४ टॉवर्स बांधण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर २००९ मध्ये या प्रकल्पात सुधारणा करत ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे दोन भव्य टॉवर्स बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी नोएडा प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली होती. या प्रकल्पाविरोधात ‘द इमेरॉल्ड कोर्ट ओनर्स रेसिडेन्ट्स वेलफेअर’ने(RWA) २०१२ मध्ये अनधिकृत बांधकामाचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Corona: कोरोनाबाबत दिलासादायक, रुग्णांची संख्या ‘इतक्या’ पटीने मंदावतेय
बांधकाम अनधिकृत ठरवून २०१४ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. या निकालाविरोधात ‘सुपरटेक’ कंपनी आणि नोएडा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं.हे बांधकाम पाडू नये यासाठी खूप प्रयत्न केले.मात्र, सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते.