
अभिनेता रणबीर (Ranbir Kapoor) कपूर सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो सध्या त्याच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीरचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामुळे रणबीर सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून वेगेवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतोय.
मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतल्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
दरम्यान, सध्या रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे रणबीर कपूर चर्चेत आला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा चाहत्यांच्या वागणुकीवरून जोरदार टीका केल्याचे दिसत आहे.
सॅमसंगच्या ‘या’ लोकप्रिय फोल्डेबल फोनवर मिळवा 49 टक्केंची सूट! वाचा भन्नाट ऑफर
नेमकं काय आहे प्रकरण?
रणबीरने एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती त्यावेळी त्याच्या एका चाहतीने त्याच्यासोबत सेल्फी घेतला आणि नंतर रणबीरला किस करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र या परिस्थितीला रणबीरनेही संयमाने हाताळलं. नंतर ती मोबाईलमध्ये दोघांचा सेल्फी पाहून रडू लागली. मात्र या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यानी नाराजी व्यक्त केली आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या कमेंट करत आहेत.
जीवाला धोका असण्याच्या चर्चांवर भडकला जेठालाल, म्हणाला, “खोटी बातमी पसरवली त्याचे…”