
तरुण पिढीने उच्च शिक्षण घेऊन देखील चांगल्या पगाराची नोकरी मिळत नसल्याने देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढतच चालली आहे. तरुण वर्गाला चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही आणि आता दिल्लीमध्ये एका महिलेले चांगल्या पगाराच्या नोकरीला रामराम ठोकला आणि चहाचं दुकान सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात! चालत्या बसने घेतला पेट
महिलेने चांगल्या पगाराची नोकरी सोडून चहाचा व्यवसाय सुरु केल्याने तिची सोशल मीडियावर अनेकांनी खिल्ली देखील उडवली आहे. सध्या सोशल मीडियावर चहाच्या स्टाॅलवरचे तिचे फोटोही देखील चांगलेच व्हायरल होत आहेत. नेमकी ही तरुणी कोण आणि तिने एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून चहाचा व्यवसाय का सुरु केला? याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
‘या’ कारणामुळे मी राजकारणापासून लांबच राहिलो; रितेश देशमुखने केला मोठा खुलासा
नोकरी सोडून चहाचा व्यवसाय सुरु करणाऱ्या तरुणीचं नाव शर्मिष्ठा घोष असे आहे. शर्मिष्ठाने इंग्लिश लिटरेचर मधून शिक्षण पूर्ण केल आहे. त्याचबरोबर ती ब्रिटीश काऊन्सिलमध्ये नोकरी देखील करत होती मात्र आता तिने नोकरी सोडून चहाचा स्टाॅल लावला आहे.
ज्यावेळी शर्मिष्ठाला विचारण्यात आलं की तू नोकरी सोडून चहाचा व्यवसाय करण्याचा निर्णय का घेतला. त्यावेळी ती म्हणाली, या चहाच्या स्टाॅलला चायोस एवढं मोठं करायचं आहे. आता चायोस किती मो हेठं आहे तुम्हाला सर्वाना माहीतच आहे. ही स्टोरी लष्करातील निवृत्त ब्रिगेडीयर संजय खन्ना यांनी सोशल मीडीयावर शेअर केली आहे.
Gautami Patil: गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी घेते ‘इतकं’ मानधन!
शर्मिष्ठाची स्टोरी वाचून काहीजण तीच कौतुक देखील करत आहेत तर काहीजण तिची खिल्ली देखील उडवत आहेत. तुमच्या शिक्षणाचा वापर तुम्ही शिकवण्यासाठी करू शकता. जर तुम्हाला फूड चेन सुरू करायचं होत तर आधी ग्रॅज्युएशन आणि चांगल्या नोकऱ्या कशासाठी केल्या, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरेंना का डावलले? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं