
पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर चालत्या वाहनात सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला गंभीर अवस्थेत अमताळी बायपासजवळ रस्त्यावर सोडण्यात आले असल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, कथित घटना सोमवारी रात्री उशिरा घडली आणि पीडित विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. (A college student was gang-raped in a moving vehicle in West Tripura district)
सर्वात मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? काय असेल नवीन नाव?
पोलिसांनी सांगितले की, त्यांनी मुख्य आरोपी गौतम शर्माला अटक केली असून बुधवारी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला आणि तिला अमताळी बायपासजवळ सोडून पळून गेल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घटनेने तेथील भागात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित विद्यार्थिनी मुख्य आरोपी गौतम शर्माशी नियमितपणे संवाद साधत असे. या विद्यार्थिनीवर कारमध्ये तीन तरुणांनी लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिला अमताळी बायपास येथे वेदनादायक अवस्थेत सोडले. त्याचबरोबर या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
Arjun Tendulkar । ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! अर्जुन तेंडुलकर जखमी