Ajit Pawar : सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या – अजित पवार

The government has thrown away the rags of democracy - Ajit Pawar

मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधिकारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. असे ट्विट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षाचे पत्र प्राप्त झाले, त्यातून लक्षात येते की त्यांना आपण सत्तेत होतो, याचे विस्मरण झाले आहे. गजनीसारखी त्यांची अवस्था झाल्याचं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.

दरम्यान, आजच्या अधिवेशनामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा तसेच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. या मुद्द्यावरून अधिवेशनामध्ये सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तर दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा मुद्दा देखील विरोधक उपस्थित करू शकतात. तर दुसरीकडे मंत्र्यांचे खातेवाटप केल्यानंतर खूप कमी दिवसांमध्येच अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने मंत्री विरोधकांच्या प्रश्नांना कसे उत्तर देणार हे खूप महत्वाचे ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वीच खाते वाटप जाहीर झाल्यामुळे मंत्र्यांना अधिवेशनाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *