युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेदरम्यान खळबळजनक वक्तव्य केले आहे. शिंदे- फडणवीस सरकार हे महाराष्ट्राचे सरकार आहे की दिल्लीश्वरांचे सरकार आहे, हेच कळत नाही. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता होणार नाही. या सरकारने सर्व आमदारांना केवळ गाजर दिले आहे. तुला मंत्री करतो, तुला मंत्री करणारच असे सांगितले आहे. असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला ( State Government) टोला मारला आहे.
भाजप नेते आक्रमक! जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास मिळणार १० लाखांचं बक्षीस
शिवसंवाद यात्रेचा पुढचा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. यामध्ये नाशिक, औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. आज ( दि.6) नाशिक ( Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी मतदारसंघातील मुंढेगाव येथून या यात्रेची सुरुवात झाली. यावेळी आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray) बोलत होते.
मोठी बातमी! राखीकडून आदिलच्या गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट; फोटो देखील झाले व्हायरल
यावेळी ते म्हणाले की, गद्दार गँगने सरकार पाडल्यानंतर मी गावागावात जाऊन लोकांशी बोलत आहे. तिथे 50 लोक असले तरी मी बोलणार. तिकडे 50 कोटीचा खर्च झाला पण त्यांच्याकडे 50 लोक येत नाही. हे सरकार जास्त दिवस टिकणार नसून एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेने ही वेळ आली आहे. गद्दारांचे सरकार फक्त होर्डिंग्जवाल्यांची कर्ज मुक्ती करत आहे, बाकी कुणाची नाही.
एकाच घरातील दोघांनी भरला उमेदवारी अर्ज; चिंचवड पोटनिवडणुकीत नवीन गोंधळ
तसेच शिंदे- फडणवीस सरकार इकडेतिकडे फिरत आहे, मात्र लोकांना त्यातून काही मिळत नाही. राज्यात अशी अनेक गावं आहे, जिथे रस्ते नाही डोल्या मधून दळणवळण नाही. आजूबाजूला समृध्दी आली, पण गावात पाणी नाही. मुंबई महापालिकेसाठी पाण्यासाठी आम्ही इथे धरण बांधले. पण आज याच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशी खंत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरे भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाले…