सरकारची मोठी घोषणा! वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 25 लाखांची मदत

The government's big announcement! 25 lakhs will be given to the families of the victims of wild animal attacks

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. यामध्येच वन्य प्राण्यांचा देखील सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. शेती करत असताना अनेक गोष्टींपासून सावधानता बाळगावी लागते. मात्र सावधानता बाळगली तरी देखील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो आपल्याला वारंवार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या मृत्यू झालेल्या बातम्या ऐकायला मिळत असतात. (Latest Marathi News )

Sharad Pawar । भाजपसोबत जाणार का? शरद पवार स्पष्टच बोलले, “आगामी निवडणुका ..”

मात्र आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला सध्या वीस लाख रुपयांची मदत दिली जात होती. आता त्यात वाढ करून ती 25 लाख रुपये केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची फाईल तयार असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेमध्ये जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ghagarkond Falls । फिरायला जाणे बेतले जीवावर! रायगड मधील प्रसिद्ध धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू

वन्य प्राण्यांमुळे झालेल्या हानीबाबत नुकसान भरपाईचे विधेयक विधानसभेमध्ये संमत केले असून त्यामध्ये तीस दिवसांच्या आत नुकसान भरपाई नाही दिली तर त्यानंतर व्याज देण्याची तरतूद देखील करण्यात आले असल्याचे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले आहे.

Ravikant Tupkar । राजकीय घडामोडींना वेग! रविकांत तुपकर स्वाभिमानीचा दुसरा गट स्थापन करणार की इतर पक्षात जाणार?

त्याचबरोबर एखाद्या पशुपालकाच्या जर गाई, म्हैस किंवा बैलाचा मृत्यू झाला तर त्या पशुपालकाच्या मालकाला दहा हजार रुपयाची मदत मिळत होती. मात्र आता या रकमेमध्ये देखील वाढ करण्यात आली असून 70 हजार रुपये मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर शेतीच्या नुकसान भरपाईची मदत देखील वाढवली जाणार असल्याचे सांगितले आहे.

Seema Haider । सीमा हैदर लवकरच तुरुंगात जाणार? पोलीस आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत; समोर आली धक्कादायक माहिती

Spread the love