
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण अर्थसंकल्प हा आयपॅडमधून वाचला आहे.
यामध्ये सरकारने महिलांच्या सशक्तीकरण आणि सबलिकरणासाठी काही मोठे निर्णय देखील घेतले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने आता लेक लाडकी योजना नव्या सुरुपात सुरू करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये तर सहावीमध्ये गेल्यानंतर 6000 रुपये सरकार देणार आहे. एवढंच नाहीतर मुलगी कॉलेजला म्हणजेच 11 वीला गेल्यानंतर 8000 रुपये आणि ती 18 वर्षांची झाल्यानंतर 75000 रुपये मिळणार असल्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात फडणवीसांनी केल्या ‘या’ १० महत्वाच्या घोषणा; वाचा एका क्लिकवर
अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा –
१) केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्याचे 6 हजार असे मिळून शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये मिळणार.
२) राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार.
३) 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
४) महिला वर्गाला एसटीमध्ये ५० टक्के सूट
५) अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ
६) महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार.
७) निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य मिळणार
८) गुढीपाडव्याला १ कोटी ६३ लाख शिधाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार.
९) शिक्षणसेवकांच्या मानधनामध्ये वाढ.
१०) शेतकऱ्यांना कर्जमाफी.
अजित पवार यांनी नेमका कुणाला डोळा मारला? सोशल मीडियावर होतेय ‘त्या’ व्हिडिओची जोरदार चर्चा