
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या २०२४ पर्यंत जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणली जाईल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला आहे.
बिर्याणी आणण्यास उशीर झाला म्हणून तरुणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बेदम मारले; वाचा सविस्तर
एकीकडे अफजलखानाच्या कबरीवरील बांधकाम हटवले तर लगेच अजून एक आनंददायक बातमी शिवप्रेमींना सरकारने दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार सध्या ब्रिटनमध्ये (Britain) आहे. त्यामुळे ही तलवार परत मिळावी यासाठी केंद्रसरकारकडून (Central Govt) पाठपुरावा देखील करण्यात येत आहे.
मोठी बातमी! ‘कसौटी जिंदगी की’ फेम सिद्धांत वीर सुर्यवंशीचं निधन
जर राज्य सरकार ही तलवार महाराष्ट्रामध्ये आणण्यास यशस्वी ठरले तर महाराष्ट्रातील जनतेला गौरवशाली इतिहासाची साक्षीदार असणारी जगदंबा तलवार पाहता येणार आहे.