Onion Rate । नवी दिल्ली : राज्यात काही दिवसांपासून कांद्याचे दर (Onion Price) कोसळले आहेत. अशातच केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क (Onion Export Charges) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांद्याचे दर आणखी कमी होऊ शकतील. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
क्रिकेट विश्वावर शोककळा! वयाच्या 49व्या वर्षी प्रसिद्ध क्रिकेटपटूनं घेतला अखरेचा श्वास
कांदा प्रश्नावरून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेतली. त्यावर चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक, अहमदनगर आणि लासलगावसह वेगवेगळ्या केंद्रांवरून २ लाख टन कांदा प्रतिक्विंटल २४१० दराने खरेदी केला जाईल, जर गरज पडली तर २ लाख टनांपेक्षाही जास्त कांदा खरेदी केला जाणार अशी ट्विटरवर घोषणा केली आहे.
Benefits Of Eating Fish । हे आहेत मासे खाण्याचे फायदे, जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, धनंजय मुंडे यांची बैठक होण्यापूर्वी फडणवीसांनी कांदा प्रश्नावर तोडगा काढला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात फडणवीस यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादी वर सरशी केल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय! २८ आठवड्यांच्या गर्भपातास दिली परवानगी